Neha foods चे हेल्दी आणि हायजेनिक प्रॉडक्ट्स

Happiness With Healthy Food Home made Food Products.
व्यवसाय वैयक्तिक गरजेतून किंवा समाजाच्या गरजेतून तसेच वैयक्तिक आवडीतून अथवा सांघिक आवडीतून निर्माण होतात.
मी आरती सोमाणी रहाणार संगमनेर अहमदनगर. माझा व्यवसाय वैयक्तिक गरजेतून निर्माण झाला आहे. गेली सोला वर्ष मी माझया व्यवसायातून ग्राहकां पर्यंत हेल्दी फूड पोहचवते आहे आणि हा माझा ध्यास आहे.
माझया व्यवसायाचे आधीचे नाव नेहा महिला गृह उद्योग होते ते बदलून ' नेहा फूड्स' असे सुटसुटीत केले व Neha'z हे ब्रँड नेम आहे. माझे नवीन प्रॉडक्ट्स सध्या Neha'z या ब्रँड नेम नि उपलब्ध आहेत. माझया व्यवसाया ची वेब साईट आहे त्यात सर्व प्रॉडक्ट्स ची माहिती मिळते.
नेहा फूड्स मध्ये खारीक पावडर,खारीक खोबरे मिक्स पावडर, उपवास पीठे, इतर पीठे, मसाले, खडा मसाला पावडर उपलब्ध आहेत.
स्वच्छ व घरगुती वातावरणात तयार होणारी हेल्दी आणि सात्विक प्रॉडक्ट्स नक्कीच ग्राहकांचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतात.
सुरवातीला खारीक पावडर, मसाले, उपवास पीठ मार्केट मध्ये आणले पण अगदीच नगण्य प्रतिसाद होता. पॅकिंग अगदीच साधे होते त्यामुळे मार्केट मिळवण्यात अडचण येत होती. कालांतराने पॅकिंग मध्ये बदल करून फोर कलर लेबल बनवले आणि त्यानंतर बऱ्यापैकी प्रतिसाद मिळू लागला. दोन बायका कामाला ही ठेवल्या.
मागे वळून पहाता गोड कडू आठवणी तरळतात पण व्यवसायात जिद्द म्हत्वाची! No give up!!
आता जवळ जवळ 30 प्रॉडक्ट्स मार्केट मध्ये आहेत काही नवीन प्रॉडक्ट्स ही येतील! दुकानदारांच्या मागणी नुसार ही काही प्रॉडक्ट्स मार्केट मध्ये आणली. कधी प्रॉडक्ट्स वाढले ते समजलेही नाही.
ब्लॉग मधून नेहा फूड्स मध्ये तयार होणाऱ्या हेल्दी आणि हायजेनिक प्रॉडक्टस ची माहिती देणार आहे. तसेच शा रिरीक व मानसिक आरोगया विषयी चर्चा करणार आहोत.
वाचकांचा प्रतिसाद मला नक्कीच प्रोत्साहन देईल!
धन्यवाद🙏 web https//nehaz.in/
Comments
Post a Comment