Happiness with healthy food{ खारीक पावडर
प्रस्तावना दिवाळी झाली की हळूहळू थंडी जोर पकडायला लागते साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी थंडीचे दिवस असतात. डिसेंबर म्हणजे कडकडीत थंडी!
जसजशी थंडी जोर पकडते तसे तसे शरीराला उबदार ठेवण्यासाठी उबदार कपडे ब्लांकेट्स रजई कपाटातून बाहेर काढले जातात. काही नवीन खरेदी केली जातात पण हे झाले शरीराचे बाहेरून रक्षण करण्यासाठी! जसे बाहेरून रक्षण करणे आवश्यक तसेच शरीराच्या आतूनही रक्षण करणे आवश्यक असते ह्यावर रामबाण उपाय म्हणजे खारीक! थंडी वाढली की प्रत्येक घरात खारीक आणली जाते पण ती फोडणे बी काढणे वाळवणे नंतर दळणे आणि आता दळण्यासाठी ही किलोला 25 ते 30 रुपये द्यावे लागतात म्हणजे महागाची खारीक आणून इतर सोपस्कार करण्यात खूप सारी शक्ती आणि वेळ वाया जातो
जर तुम्हाला रेडीमेड दळलेली खारीक पावडर मिळाली तर.......... आणि तीही खात्रीशीर अगदी घरच्या सारखी आणि काही त्रास नाही........ काय मी मनातलं बोलले ना! चला तर मग आपण नेहा गृह उद्योगात जाऊया आणि ऑथेंटिक हेल्दी होम मेड खारीक पावडर घेऊया.
मी आरती सोमानी नेहा गृह उद्योगाची प्रोप्रायटर गेली 15 वर्ष मी गृहउद्योग चालवते आणि खारीक पावडर ही माझ्या गृह उद्योगाची स्पेशालिटी आहे. अनेक ग्राहक वेगवेगळ्या गावातून आणि दुकानातून खारीक पावडर खरेदी करतात आणि विश्वासाने सेवन करतात.
खारीक पावडर माझ्या गृह उद्योगाचे स्पेशल प्रोडक्स असल्याने उन्हाळ्यात खार कांची पोत्यांनी खरेदी होते व ती फोडून त्यातील बी वेगळे करून वाळवून प्लास्टिक पिशव्या भरुन ठेवली जाते व वेळोवेळी काढून दळून दिली जाते अगदी फ्रेश!!!
खारीक उष्ण धर्मीय असल्याने म्हणून ती थंडीत खाल्ली जाते व डिंक लाडू करण्यासाठी खारीक व गोटा खोबरे असे मिक्स खारीक खोबरे पावडर ही उपलब्ध आहे दोन्ही प्रोडक्स म्हणजे 1) खारीक पावडर 2) खरिक खोबरा मिक्स पावडर
आता खारके विषयी आपण माहिती घेऊया
खारीक म्हणजे वाळलेला खजूर! खारीक शरीराला आतून उष्ण ठेवते तसेच हेल्दी व स्ट्रॉंग बनवते खा रकेत कॅल्शियम लोह फायबर झिंक मॅग्नेशियम ही खनिज द्रव्य असतात.
खारीक कशी खावी? खारीक नुसती खातात तसेच खारीक पावडर दुधात टाकूनही खातात किंवा शुद्ध तुपात भिजून खातात गरम दुधात आपल्या आवडीप्रमाणे खारीक पावडर टाकून खाल्ल्यास हाडे मजबूत होतात व दात पक्के होतात कारण त्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते.
सायनसचा त्रास असल्यास खारीक पावडर थोडीशी मिरी पावडर व वेलची पावडर दुधात एकत्र उकळून घ्यावी तसेच ब्लड सर्कुलेशन व लघवी च्या समस्या किडनी स्टोन व पाठ दुखी लकवा मारणे या समस्यांसाठी खारीक पावडर सकाळ संध्याकाळी दुधात उकळून घेणे आहे की नाही फायदेशीर!!... तर चला मग या थंडीत आपण नेहा गृह उद्योगाची ऑथेंटिक स्पेशल खारीक पावडर खरेदी करूया.
250 ग्रॅम 500 ग्रॅम एक किलो मध्ये पॅकिंग उपलब्ध आहे.
माझा हा ब्लॉग कसा वाटला ते लाईक व कमेंट करून जरूर कळवा आणि हो आपल्या प्रियजनां बरोबर नक्की शेअर करा.😊
धन्यवाद👏
.
Khoop chan mahiti Aarti tai 👌👌
ReplyDeleteखूपच मौल्यवान माहिती...👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद मनीषा आणि आरोग्यम धनसंपदा😀
ReplyDeleteधन्यवाद मनीषा आणि आरोग्यम धनसंपदा😀
ReplyDeleteSuperb 👍
ReplyDeleteधन्यवाद विद्या😀
ReplyDelete