Posts

Showing posts from March, 2022

खारकेचा इतिहास

Image
  खजूर पासून  खारीक बनते म्हणजेच आपल्याला खजुराचा इतिहास इतिहास पहाणे आवश्यक आहे. नमस्कार मी आरती सोमानी हॅपिनेस वीथ हेल्दी फूड होम मेड फूड प्रॉडक्ट या प्लॅटफॉर्मची संस्थापिका व गेले पंधरा वर्ष मी नेहा फुड्स हा गृह उद्योग चालवते. व या गृहोद्योगातून खारीक पावडर व खारीक खोबरा मिक्स पावडर हे प्रोडक्स तयार करते म्हणून आज आपण खारके चा इतिहास बघू यात. खजुराचे मूळ नाव Phoenix dactylifera असे आहे. हा एक ताड जातीचा वृक्ष आहे. याची शेती त्याचे फळ खाण्यासाठी केली जाते. ती शेती खूप आधीपासून केली जाते पण त्या शेतीचे मूळ शोधणे अशक्य आहे. याचे मूळ स्थान उत्तर आफ्रिका किंवा दक्षिण पश्चिम आशियात असण्याची शक्यता आहे. हा एक मध्यम आकाराचा वृक्ष असून त्याची उंची 15 ते 25 मीटर असते. आठ बाय आठच्या अंतराने खजुराची रोपे लावतात व त्यांना पाच वर्षांनी फळ येते ही फळे  झुपक्यांनी येतात. कोणते खजूर चांगले असतात? बाजारात सौदी अरब आणि इराणच्या खजूराना मागणी असते. खजुरा न मध्ये खूप सारे प्रकार येतात. पण सगळ्यात महाग खजूर सौदी अरब च्या मदिना शहरातला आहे त्याचे भाव अठराशे ते पस्तीस शे प्रति किलो आहे त्याला...