पौष्टिक खा नि सुदृढ रहा!
प्रस्तावना साधारणतः ७० ते ८० च्या दशकात प्रॉडक्ट्स च्या जाहिरातींचे रेडिओ हेच मध्यम होते. थिएटरमध्ये सुरवातीला काही जाहिराती दाखवल्या जायच्या त्यातील मला विकोची जाहिरात आठवते. किराणा दुकानांनी लक्स, रेकसोना, लाईफबॉय ह्या साबणाच्या तसेच डालडा वनस्पती तूप, लिप्टन, ब्रूकबॉण्ड चहाच्या जाहिराती चिटकवलेल्या दिसायच्या, मोठया शहरांनी प्रॉडक्ट्स च्या जाहिराती मोठया बोर्डवर असत. हळूहळू जमाना बदलला आणि ९० पर्यंत घराघरात टी व्ही पोहचला व प्रत्येक प्रॉडक्ट्सची जाहिरात दिसू लागली आणि मार्केटिंगचे महत्व वाढले डिजिटल काळ आता सध्याचा काळ हा डिजिटल मार्केटिंग चा आहे. अनेक प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये येतात, स्पर्धा वाढली आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम आल्या; आपला माल जास्तीत जास्त कसा विकला जावा म्हणून दुकानंदारांना आणि ग्राहकांना अनेक प्रलोभने दिली जाऊ लागली आपल्याकडे काही लोकांना कमी किमतीचा माल लागतो. त्याचा फायदा काही उत्पादकांनी उचलला व low quality माल बाजारात उपलब्ध केला.कच्च्या माल निकृष्ट त्यामुळे उत्पादन खर्च...